Tur Rate Live : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज ४ फेब्रुवारी महाराष्ट्र उत्पन्न बाजार समिती मध्ये अनेक बाजार समिती मध्ये तूरीच्या भावात मोठी तेजी येते आहे. काही जाणंकरांच्या मते असे जर भाव वाढत असतील तर लवकरच तूरीचे भाव हे ८००० होऊ शकतात. महत्वाचे म्हणजे सगळ्याच बाजार समिती मध्ये तूरीचे भाव हे ८ हजार होतील याची शक्यता कमी आहे.
Tur Rate Live |
आजचे तूरीचे भाव २०२३ ( Tur Rate Live )
लासलगाव निफाड तूरीचे भाव : महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज तूरीची आवक हि आतापर्यंत १ क्विंटलच आली आहे. पण या ठिकाणी सरासरी तूरीला भाव ६ हजार २०१ इतका प्रति क्विंटल मिळाला आहे. लासलगाव निफाड बाजार समिती मध्ये आज ४ फेब्रुवारी कमीत कमी भाव ६ हजार २०१ तर जास्तीत जास्त भाव ६ हजार ५०० पर्यंत प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
👇👇👇👇👇
अकोला तूरीचे भाव : महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये अकोला या बाजार समिती मध्ये २ हजार ५१३ क्विंटल पर्यंत आवक पोहचली आहे. या बाजार समिती मध्ये तुरीला सरासरी भाव ६ हजार ९०० पर्यंत प्रति क्विंटल मिळाला आहे. अकोला बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ६००० तर जास्तीत जास्त भाव ७ हजार ७०० पर्यंत प्रति क्विंटल लाल तूरीला भाव मिळाला. महत्वाचे म्हणजे याठिकणी प्रति क्विंटल मागे आज ३० रुपयांनी भाव कमी झाले आहेत.
👇👇👇👇👇
कांद्याचे भाव, सोयाबीनचे भाव, कापसाचे भाव,
धुळे तूरीचे भाव : महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मधील धुळे येथे लाल तूरीची आवक हि फक्त ४८ क्विंटल पर्यंत आली आहे. शेतकरी मित्रांनो, या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ६ हजार ४०० तर जास्तीत जास्त भाव ६ हजार ६०० तसेच सरसरी भाव ६ हजार ५०० पर्यंत भाव मिळाला आहे.
रावेर तूरीचे भाव : महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर येथे सरासरी तूरचे भाव हे ६ हजार ३९५ पर्यंत होते. तसेच या ठिकाणी लाल तूरीच आवक १२ क्विंटल पर्यंतच आली आहे. रावेर बाजार समिती मध्ये कमीत कमी ६ हजार २४० तर जास्तीत जास्त भाव ६ हजार ४३० प्रति क्विंटल मिळत होता.
सिंदी तूरीचे भाव : मित्रांनो सिंदी या बाजार समिती मध्ये आज ४ फेब्रुवारी कमीत कमी भाव ६ हजार ६०० तर जास्तीत जास्त ७ हजार ०१० पर्यंत लाल तूरीचे भाव होते. तसेच सिंदी बाजार समिती मध्ये आतापर्यंत लाल तूरीची आवक हि ५० क्विंटल पर्यंत आली आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी येथे सरासरी लाल तूरीला भाव ६ हजार ८४० प्रति क्विंटल मिळत होता.