India Meteorological Department : हवामान खात्याने दिलेल्या अपडेटनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून आपल्या देशाकडे येणार आहे. यामुळे उत्तर कोकणात तसेच विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार तसेच अनेक जोरदार वाऱ्यासह मेघगर्जना होणार आहे. उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होईल तसेच तूरळक ठिकाणी हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस पडेल.
कमी दाबाचे पट्टे सक्रीय | India Meteorological Department
कोटा, रायसेन, बिकानेर या भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. संबलपूर, दिघाकडे तसेच बंगालच्या उपसागरात ईशान्यकडे कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. नैलृत्य राजस्थान पासून ते ओडिशा पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मध्य महाराष्ट्र पासून ते कोकण पर्यंत तसेच पूर्व व मध्य प्रदेश पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तसेच उत्तर अंदमान समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत.
Maharashtra Rain Alert : 23 जिल्ह्यात आज पावसाचा जोर वाढणार
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात आज जोरदार पाऊस पडणार आहे. ठाणे, पालघर, नंदूरबार, धुळे, रायगड, पुणे, नाशिक, जळगाव, वाशिम, अकोला, छत्रपती संभाजीनगर, कोकण, सातारा, नगर, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यात आज पावसाचा इशारा दिला आहे.
आज पाऊस पडणार ?
कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे, राजस्थान तसेच गुजरात आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात सुध्दा परिणाम होत आहे. आज कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार तसेच कुठे पाऊस वाढणार हे सविस्तर खाली वाचा.
ऑरेंज अर्लट : बहूतांश भागात जोरदार पाऊस पडणार
उत्तर कोकण : रायगड, पालघर, ठाणे
मध्य महाराष्ट्र : धुळे, जळगाव, पुणे, नाशिक, नंदूरबार
विदर्भ : वाशीम, अकोला
Health Tips : थंड अन्नाचं सेवन केल्याने शरीरासाठी घातक
येलो अर्लट : तूरळक ठिकाणी जोरदार पाऊस
छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, सातारा, नगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, सांगली, सोलापूर