Weather News Today : राज्यातील अनेक भागात भंयकर पाऊस पडत असल्यामुळे मानवी जनजीवन विस्कळीत झालेले चित्र पाहयला मिळत आहे. पुन्हा एकदा राज्यातील अनेक जिल्ह्यात तसेच शहरात अति मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे हवामान खात्याने नागरिकांना सर्तक राहण्याचा सूचना दिल्या आहेत.
5 तासात 15 जिल्ह्यांत भंयकर पाऊस | Weather News Today
पुढील 3 ते 4 तासात अनेक जिल्ह्यात तूफान पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई, पालघर या ठिकाणी काही तासातच अति मुसळधार पडल्यामुळे जनजीवन धोक्यात गेले आहे. हवामान खात्यानुसार, राज्यातील नांदेड जिल्ह्यात आज सकाळ पासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तसेच रिमझिम पाऊस सुरु आहे. पुढील ३ ते ४ तासात वादळी वाऱ्यासह नांदेड जिल्ह्यात तूफान पाऊस होण्याची शक्यता आहे.
तसेच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जळगाव जिल्ह्यात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. परंतू बहूतांश भागात पुढील काही तासात मेघगर्जनासह मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यात आज भाग बदलत मुसळधार पाऊस होण्याची शकता आहे.
हवामान खात्यानुसार पुढील ३ ते ४ तासात छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, रायगड, ठाणे या जिल्ह्यात आज भाग बदलत तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर उर्वरित भागात ढगाळ वातावरण किंवा रिमझिम पाऊस पडू शकतो.
आयएमडीने दिलेल्या हवामान अंदाजन नुसार, पुढील पाच दिवस राज्यातील कोकण भागात सर्वाधिक पावसाचा जोर असणार आहे. तसेच कोकण भागात पुढील काही दिवसासाठी रेड अर्लट जारी केला आहे.