Weather News Today Live : जून महिना संपला, जुलै महिना अर्धाहून अधिक संपला तरीही राज्यातील काही भागात पेरण्या झाल्या नाहित. सध्याच्या परिस्थितीत तूरळक ठिकाणीच चांगल्या प्रकारे पाऊस पडला आणि उर्वरित महाराष्ट्रात पावसाने दडी मारली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या परंतू निसर्ग साथ देत नसल्याने शेतकऱ्यांनवर दुबार पेरण्याचे संकट उभा राहीले आहे.
पुढीत २ ते ३ तासात ठाणे कोकण भागात पावसाची शक्यता तसेच विदर्भात सुध्दा आज पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार राज्यातील काही भागात ३ ते ४ दिवस पावसाचा अंदाज कायम असणार आहे.
हवामानाचा अंदाज बातम्या | Weather News Today Live
हवामान खात्याने आज दिलेल्या अंदाजनुसार मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात तसेच उत्तर महाराष्ट्रात सुध्दा मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसेच मराठवाड्यात सुध्दा १५ जुलै रोजी पावसाचा अंदाज जाहिर केला आहे. ठाणे, पालघर, नाशिक, नंदूरबार, सातारा, सोलापूर हे जिल्हे सोडून उर्वरित भागातील जिल्ह्यांना आज हवामान विभागाने येलो अर्लट जारी केला आहे.
गेल्या दीड महिन्यापासून मराठवाड्यातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. जुलै महिन्यात सुध्दा पेरण्या योग्य पाऊस मराठवाड्यात पडला नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खुंळबल्या आहेत. तसेच आतापर्यंत मराठवाड्यात ४४ टक्के शेती जमीनवर पेरण्या बाकी आहेत. परंतू मराठवाड्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहेत.