Weather Today 2023 : भारतातून मॉन्सून माघारी जात असताना महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. हवामान खात्यानुसार, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज तूरळक ठिकाणी वीजांसह जोरदार वारे तसेच अति मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसेच उर्वरित भागात हलका ते मध्यम प्रकारचा होत राहणार आहे.
Cotton Rate : कापसाला चांगला भाव मिळण्यास सुरुवात
India Meteorological Department | आजचा हवामान अंदाज | Weather Today
अंदमान समुद्रात कमी दाबाचा पट्टा ३० सप्टेंबर पर्यंत होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्याच्या परिस्थितीत कमी दाबाचा पट्टा मालदा ते मणिपूर पर्यंत पाहयला मिळत आहे. तसेच मध्य महाराष्ट्र ते झारखंड पर्यंत कमी दाबाच पट्टा सक्रीय आहे. महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार असल्यामुळे हवामान खात्याने आज विदर्भ आणि कोकण भागात मेघगर्जनासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचप्रकारे मरावाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात तूरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो, यामुळे हवामान खात्याने येलो अर्लट जारी केला आहे.
आज पाऊस पडणार का ? | येलो अर्लट
वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, ठाणे, रायगड, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील व्हा