IMD : सध्या महाराष्ट्रात विहिरी कोरड्या होत चाललया आहेत. तसेच अनेक जिल्ह्यातील बहूतांश भागात पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पाणी टंचाई भासत आहे. १ जून पासून ६ सप्टेंबर पर्यंत बहूतांश जिल्ह्यातील अनेक गावात पाऊस खुपच कमी पडला आहे.
18 जिल्ह्यात दुष्काळाचे संकट | India Meteorological Department
हवामान खात्यानुसार सांगली, सातारा, नंदूरबार, जळगाव, धुळे, अमरावती, गोंदिया, बुलढाणा, वाशिम, अकोला, जालना, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नगर, धाराशिव, बीड या सर्व जिल्ह्यात १ जून पासून ६ सप्टेंबर पर्यंत २० ते ५९ टक्क्यांनी पाऊस कमी पडला आहे. या जिल्ह्यांत पावसाची कमतरता असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके जळून गेली आहेत. तसेच वरील १८ जिल्ह्यापैकी अनेक जिल्हे दुष्काळकडे जात आहे. हवामान खात्यानुसार, उर्वरित जिल्ह्यातहि दुष्काळ पडू शकतो.
हवामान अभ्यासक डॉ. रामचंद्र साबळे यांच्या मते, एल निनो हा सक्रीय असल्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोरच्या पावसावर परिणाम करत आहे. यामुळे राज्यात जोरदार पावसाची शक्यता कमी राहिल तसेच मोठा पावसाचा खंड सुध्दा पडू शकतो.
हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात १५ सप्टेंबर पर्यंत मेघगर्जनासह मुसळधार पाऊस पडत राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. तसेच विदर्भात आणि कोकण भागात अति मुसळधार पाऊस पडू शकतो.
सर्वात महत्वाचे म्हणजे राज्यातील बहूतांश भागात पाऊस पडला नाही. यामुळे शेतकऱ्यांचे पिके सुकून व जळून जात आहे. अशीच जर राज्यात परिस्थिती चालू राहिली तर शेतकऱ्यांच्या हातात कोणतेहि उत्पादन हाती येणार आहे.