India Meteorological Department : पुढील दोन दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होऊ शकतो तसेच अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस सुध्दा पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
झारखंड आणि उत्तर प्रदेश मध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. तसेच येथील मान्सूनचे वारे हे उत्तर दिशेने जातील असा अंदाज वर्तवला जात आहे. हवामान खात्यानुसार पुढील दोन दिवसात उर्वरित भागातहि पावसाची सुरुवात होणार आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
Maharashtra Monsoon : 23 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर पर्यंत राज्यात जोरदार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने पाच जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. हवामान खात्याने, नंदूरबार, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांना आज ऑरेंज अर्लट जारी केला आहे. उर्वरित भागात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात आज पासूनच मेघगर्जना होण्याची दाट शक्यता आहे.
आज पाऊस पडणार का ?
हवामान खात्यानुसार, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, नंदूरबार, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, बुलढाणा, वाशिम, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांत अति मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच बुलढाणा, जालना, परभणी, यवतमाळ, नांदेड, अकोला, वाशीम, भंडारा, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बीड, लातूर, नगर, पुणे, सातारा, धाराशिव, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक या जिल्ह्यांत भाग बदलत पावसाचा इशारा दिला