Weather Update : आज विदर्भात जोरदार पाऊस

Weather Update : आज विदर्भात जोरदार पाऊस
Weather Update : आज विदर्भात जोरदार पाऊस

 

Monsoon Rain : कोकणात पावसाचा जोर वाढला असून, राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. गेल्या आठवडाभरापासून दक्षिण-पश्चिम मोसमी वारे वाहू लागले आहेत. कोकणात पावसाचा जोर वाढला असून, राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. आज (दि. 21) विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. कोकणातील घाटमाथ्यावर तसेच पुणे, सातारा जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

गुरुवारी (ता. 20) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत उत्तर कोकणात मुसळधार पाऊस झाला, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पालघर आणि रायगड जिल्ह्यात अधिक पाऊस झाला. पालघरमध्ये 130 मिमी तर रायगडमधील कर्जतमध्ये 110 मिमी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भ आणि खान्देशच्या उत्तर भागासह राज्यात मान्सून अपेक्षित आहे.

राज्यात ढगाळ वातावरण असून हलक्या सरी पडत आहेत. पावसाच्या संपर्कात असलेल्या भागात कडक ऊन आणि उष्णता असते. पावसामुळे विदर्भात कमाल तापमानात घसरण सुरू झाली आहे. गुरुवारी (ता. 20) सकाळपर्यंतच्या 24 तासांत जळगावात सर्वाधिक 38.7 अंश तापमानाची नोंद झाली.

आज (दि. 21) विदर्भातील अमरावती, यवतमाळ, गडचिरोली जिल्हे, कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे व सातारा जिल्ह्यांत अतिवृष्टीचा (ऑरेंज अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Leave a Comment