IMD : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडणार आहे. हवामान खात्यानुसार, पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढणार आहे. १५ सप्टेंबर पर्यंत राज्यात पाऊस पडू शकतो असा अंदाज जांणकारांनी व्यक्त केला आहे.
आज पुणे जिल्ह्यात पहाटे पासून जोरदार पाऊस पडत आहे. हा जोरदार पाऊस पडल्याने नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागला पण शेतकऱ्यांच्या पिकांना नवीन जीवन दान मिळाले आहे. मुंबई शहरात काल पासून पाऊस पडत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात आज जोरदार पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस मराठवाड्यात, मध्य महाराष्ट्रात, विदर्भात जोरदार पावसाची सुरुवात होईल. मुंबई, ठाणे, पालघर शहरात आज पासून पावसाची सुरुवात होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.