Weather Update : उत्तर भागात आज पावसाचा जोर वाढत जाणार

Weather Update : उत्तर भागात आज पावसाचा जोर वाढत जाणार
Weather Update : उत्तर भागात आज पावसाचा जोर वाढत जाणार

 

Weather Update : उत्तर भारतात आज 9 जुलै रोजी पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. विविध भागात मुसळधार पाऊस पडल्याने, जनजीवन विस्कळीत होत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे सामान्य लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजनुसार, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, जम्मू काश्मीर, दिल्ली या सहा राज्यात पुढील दोन भाग बदलत अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते ( india meteorological department ) महाराष्ट्रात ११ जुलै पर्यंत कोकण भागात, घाट माथ्यावर तसेच मध्य महाराष्ट्र मध्यम स्वरुपाचा पाऊस तसेच काही भागात अति मुसळधार पाऊस सुध्दा होऊ शकतो.

प्रादेशिक हवामान अंदाजनुसार, मुंबई, ठाणे, पुणे भागात पावसाचा जोर कायम असणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अति मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसेच हवामान विभागाच्या मते सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात भाग बदलत मुसळधार पाऊस होऊ शकतो. पुढील ४ ते ५ दिवसात राज्यातील कोकण भागात तसेच मुंबई, पुणे भागात पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे.

हवामान अंदाज : सर्व माहिती WhatsApp Group वर मिळवा.

Monsoon Update Today : राज्यात अजून पावसाची किती टक्के गरज ?
Monsoon Update Today : राज्यात अजून पावसाची किती टक्के गरज ?

Leave a Comment