India Meteorological Department : पुढील 5 दिवस पावसाचा इशारा

India Meteorological Department : पुढील 5 दिवस पावसाचा इशारा
India Meteorological Department : पुढील 5 दिवस पावसाचा इशारा

 

Weather Update : ऑगस्ट महिना सुरु होताच पावसाने उघडीप घेतली त्यानंतर बहूतांश भागात मुसळधार पाऊस पडलेला नाही. पाऊस न पडल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांन समोर मोठे संकट उभे राहिले आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजनुसार, राज्यात पुढील पाच 5 दिवस हलका ते मध्यम प्रकाराचा पाऊस होत राहणार आहे.

३ सप्टेंबर पासून राज्यात पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. तसेच पुढील काही दिवस पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा इशारा जारी केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस पडू शकतो. तसेच उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात हलक्या सरी पडू शकतात.

आपणास महिती असेल की, पुणेसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा जारी केला आहे. परंतू अनेक भागात पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांन वर दुबार पेरणीचे संकट वाढले आहे. अरबी समुद्रातून वाऱ्यांचा वेग तीव्र गतीने वाढल्यास कोकण, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडू शकतो.

मुंबई मध्ये सोमवारी आणि मंगळवारी हलका पाऊस पडलेला आहे. यामुळे मुंबई मध्ये उष्णते पासून काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतू आज रात्री मुंबई मध्ये ढगाळ वातावरण राहिल किंवा हलका पाऊस पडेल. तसेच सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी राहिल अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

India Meteorological Department :  24 तासात 11 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
India Meteorological Department :  24 तासात 11 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

Leave a Comment