ज्या शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ दरम्यान कांदा विक्री केला असेल तर तुम्ही अनुदान मिळवण्यासाठी पात्र आहात.
ज्या ठिकाणी कांदा विक्री केला आहे. त्याच ठिकाणी तुम्ही अर्ज सदर करु शकतात. कृषि उत्पन्न बाजार समिती, नाफेड खरेदी केंद्र, खाजगी बाजार किंवा थेट पणन कडे अर्ज सदर करु शकता.
अर्ज सोबत लागणारे कागद पत्रे, कांदा ( Onions ) विक्रीची मुळपट्टी व त्याची नोंद असलेली सात बारा उतारा, बँक पासबुक वरील पहिल्या पेज वरील झेरॉक्स, आधार कार्डची प्रत,
सात बारा वर वडीलांचे किंवा इतर कुटूंबातील सदस्यांचे नावे असतील तुम्ही त्यास सहमतीचे शपथ पत्र जोडणे आवश्यक आहे.