Sugar Production : यावर्षी राज्यात साखरेचे उत्पादन कमी असल्यामुळे देशात हि साखरेचे उत्पादन कमी झाले आहे.

देशात प्रथम महाराष्ट्रात हंगाम संपला आणि उत्तर प्रदेश मध्ये सारखरेचे उत्पादन वाढले आहे.

यावर्षी देशात १५ एप्रिल पर्यंत अंदाजे ३११ लाख टन तर महाराष्ट्रात १०५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

मागील वर्षी देशात ३२८ लाख टन सारखरेचे उत्पादन तर राज्यात १२६ लाख टन सारखरेचे उत्पादन झाले आहे.

देशात १६ लाख टन आणि राज्यात २१ लाख टन साखरेचे उत्पादन घटले आहे.

मागील वर्षी उत्तरप्रदेश मध्ये ९४ लाख साखरेचे उत्पादन झाले होते. पण यावर्षी उत्तरप्रदेश मध्ये २ लाख टन सारखरेचे उत्पादन वाढले आहे. म्हणजेच उत्तरप्रदेश यावर्षी ९६ लाख सारखरेचे उत्पादन झाले आहे.

कर्नाटक मध्ये यावर्षी ३ लाख टनाने साखरेचे उत्पादन कमी झाले असून यावर्षी फक्त ५५ लाख टन सारखरेचे उत्पादन झाले आहे.