‍Wheat Prices : सणासुदीत गव्हाच्या किंमतीत मोठी वाढ

Wheat Prices : सणासुदीत गव्हाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. केंद्र सरकारने जेव्हा पासून गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर बंदी घातल्यापासून गव्हाच्या किंमतीत मोठी सुधारणा होत आहे. तसेच शेतकऱ्यांनमुळे आज भारत जगात दुसरा गहू उत्पादक देश बनला आहे. गव्हाच्या किंमतीत मोठी वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांन आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

गव्हाच्या किंमतीत तीन टक्क्यांनी वाढ

सणासुदीत गव्हाच्या किंमतीत २ ते ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचे मुख्य कारण भारतात गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर बंदी झाली, तेव्हापासून गव्हाच्या भावावर परिणाम झालेला पाहिला मिळत आहे. आज भारतात गव्हाचे भाव २४२० ते २४५० (‍ क्विंटल ) पर्यंत भाव पोहचले आहेत. केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब योजनेचा विस्तार नाही केला तर गव्हाच्या भावात मोठी वाढ होईल, तसेच पंतप्रधान गरीव योजनेचा विस्तार झाला तर गव्हाच्या किंमतीत मोठी घट होण्याची शक्यता आहे. असे जाणकरंचे मत आहे.

भारत जगात दुसरा गहू उत्पादक देश बनला 

भारत जगात दुसरा गहू उत्पादक देश बनला आहे. १९६० सालापासून हरित क्रांतीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत भारताने महत्वाची भूमिका बजवली आहे. हरित क्रांती १९६० साली तेव्हा ९८ लाख टन गव्हाचे उत्पादन होत होते. १९६० ते २०२२ पर्यंत गव्हाचे उत्पादनात १००० टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतात मागील वर्षी २०२१ ते २०२२ मध्ये गव्हाचे उत्पादन १०६८ लाख टन झाले आहे. 

गव्हाचे उत्पादन पटीने वाढले

हरित क्रांतीने कृषी क्षेत्रात मोठी भूमिका बजावली आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, आज भारतात गव्हाचे उत्पादन प्रति हेक्टरी तीन पटीने वाढले आहे. १९६० वर्षी गव्हाचे उत्पादन प्रति हेक्टर ७ क्विंटल ५७ किलो पर्यंत होते. तसेच मागील २०२१ वर्षी गव्हाचे उत्पादन २.३ टन झाले असून २०२२ पर्यंत गव्हाचे उत्पादन १०.६ टन होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment