Wheat Rate News : गहू उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे. यावर्षी गव्हाला चांगला भाव मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही जाणंकारांच्या मते काही महिन्यात गव्हाच्या भावात चांगलीच तेजी आली होती.
Wheat Rate News |
चार महिन्यापूर्वी गव्हाला २३०० प्रति क्विंटल दर मिळला होता मात्र आता गव्हाला २९०० प्रति क्विंटल भाव मिळाल आहे. गव्हाचे वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान पाहयला मिळत आहे. जोपर्यंत केंद्र सरकार खुल्या बाजारात गहू आणत नाही तो पर्यंत गव्हाच्या भावात घसरण होणार नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाची मागणी वाढत आहे. अनेक देशात मोठ्या प्रमाणात दुष्काळ सारखी स्थिती निर्माण झाली आहे तसेच अमेरिका, पाकिस्तान, बांग्लादेशात मुसळधार पावसामुळे तेथील पिकांचे नुकसान झाले आहे.
भारतात मोठ्या प्रमाणात गव्हाचा साठा वाढला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढल्यामुळे भारताची निर्यात सुध्दा वाढली आहे. यावर्षी देशात सुध्दा उष्णतेमुळे गव्हाच्या उत्पादनात मोठी घट पाहता हमीभावा पेक्षा खाजगी बाजारात गव्हाला जास्त भाव मिळत आहे.
केंद्र सरकारकडे बफर स्टॉक, आवक कमी मध्ये मोठी घट पाहयला मिळाली त्यामुळे गव्हाच्या दरात घसरण होण्याची शक्यता कमी आहे. गव्हाच्या भावात मोठी तेजी येऊ नये किंवा दर नियंत्रणात राहावे यासाठी सरकारकडून गव्हाची निर्यात थांबण्यात आली आहे.
गव्हाच्या उत्पादनात घट पाहता स्टॉकिस्टने विक्री थांबवली आहे. तसेच उद्योगाकडून सुध्दा केंद्र सरकारकडे गहू विक्री करावी असे आवाहन केले जात आहे पण सरकारकडेच गव्हाचा साठा कमी असल्याचा दावा काही जाणंकार करत आहे. त्यामुळे केंद्र सरकार अजून कोणताही निर्णय घेत नाही.
काही जाणंकारांच्या मते यावर्षी सरकारकडे गव्हाचा साठा कमी तसेच सरकारने गहू विक्रीस नाही काढल्यास, तर यावर्षी गव्हाच्या भावात मोठी तेजी आल्याशिवाय राहणार नाही.